Skip to Main Content

Current Domain

 
 
 
 
 
पुणे बिहाइव्हमध्ये आपले स्वागत

पुणे तिथे काय उणे असं पुण्याविषयी म्हटलं जातं. पुण्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. इतिहास, परंपरा त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातही पुण्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे.

पूर्वी पेंशनरांचं गाव अशी जी पुण्याची ओळख होती ती पुसून आता पुण्यानं आयटी क्षेत्रात मानाचं स्थान पटकावलं आहे. पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अशी काही मानाची ठिकाणंही इथलीच.

बदलत्या काळाबरोबर पुण्याचं स्वरूप बदलतं आहे. पूर्वीचा शांत आणि संथपणा जाऊन महानगराचा वेग पुण्यानं आपलासा केला आहे. परंतू शहरीकरणासोबत येणाऱ्या सोई सुविधांबरोबर काही प्रश्नही तयार झाले आहेत. झोपडपट्ट्या, गटारे, अनारोग्य, नोकरी-व्यावसाय, पर्यावरण, शेती या क्षेत्रात काही समस्याही निर्माण झाल्या आहेत.  

बऱ्याच वेळेला समस्या सोडवण्याचे पर्याय आजूबाजूला असून देखील ते पर्याय योग्यवेळी उपलब्ध झाले नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. पुणे बिहाइव्ह या वेबसाईटच्या माध्यमातून शिक्षणासोबत शेती, रोजगार, उद्योग आणि आरोग्य या क्षेत्रात गरजू लोकांना नेमकेपणानं मार्गदर्शन करणे हा आमचा मानस आहे. 

In partnership with:

       Symantec

संपादकाची निवड

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation