Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

जोडारी (फिटर) कोर्स

जोडारी (फिटर) कोर्स
सौजन्य - www.casmumbai.org

जोडारी (फिटर) कोर्ससाठी शैक्षणिक आर्हता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कंपनीला उपयुक्त अशा ज्या ऑपरेशनसारख्या बाबी उदा. अॅक्सोइंग, चिपींग, ड्रिलींग, फायलिंग हे कोर्समध्ये शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कामातील अचुकता साधण्यात येते. उत्पादन, मेंटनन्स ही अचूकरित्या साधण्याचे प्रशिक्षण जोडारी (फिटर) कोर्समध्ये दिले जाते. 
व्यवसायाच्या दृष्टीने उदारणार्थ, वेल्डिंग कामाला सुरुवात केल्यास ग्रील आणि दरवाज्यांचे काम मिळण्यास मदत होते. त्यामुळे आर्थिक फायदा चांगल्या स्वरुपात होतो. या व्यवसायात ३५ टक्के ते ४० टक्के फायदा अपेक्षित आहे. त्यासाठी व्यवसायचे नियोजन चांगले असणे आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जोडारी (फिटर) प्रशिक्षितांना मागणी असते. पत्र्यावर होणारे काम, वेल्डिंग, टर्नर, कातरी, लोहारी काम, लिफ्ट मशिन अशाप्रकारे विविध प्रकारे दुहेरीस्वरूपाचा व्यवसाय म्हणून याकडे पहिले जाते. 
जोडारी (फिटर) कोर्समध्ये परिपूर्ण व्यवसायनुरूप म्हणून पहिले जाते. जास्तीतजास्त कौशल्ये आत्मसात केल्यास आस्थापनातील नोकरीमध्ये फायदा होतो. मेकॅनिकल विभागात लागणारे ऑपरेशनचे परिपूर्ण ज्ञान हे जोडारी (फिटर) कोर्समध्ये मिळते.    


– विवेक महाजन
   शिक्षक - निर्देशक : जोडारी (फिटर)
   आय.टी.आय., मुंबई

शब्दांकन - विनित मासावकर
              vinit.masavkar@pif.org.in

 
3.75
सरासरी 3.8 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation