Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

या विभागात

सर्वसाधारण आरोग्याची काळजी

आरोग्याची काळजी

उत्तम नियोजनासाठी जशी दूरदृष्टीची आवश्यकता असते, उत्तम प्रसंगावधानासाठी चौफेर दृष्टीची आवश्य कता असते, तसेच आरोग्यासाठी, संपन्न दीर्घायुष्यासाठी "आरोग्य दृष्टी' असायला हवी.

आरोग्य ही आपली हक्काची संपत्ती आहे. बॅंकेतील पैसे किंवा इतर प्रॉपर्टी वृद्धिंगत व्हावी,टिकावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. मात्र ज्याच्या आधारावर, भरवशावर या सगळ्या गोष्टी करायच्या त्या आरोग्याला बहुतेक वेळा दुर्लक्षित केले जाते. दिवसेंदिवस नवनवीन रोगांची नावे कानावर पडत आहेत. असे काही आपल्याला होऊनये असे वाटत असेल, तर त्यासाठी जीवनात पदोपदी आरोग्य दृष्टी ठेवायला हवी.

आरोग्य दृष्टीतला सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत भाग म्हणजे स्वतःची प्रकृती माहिती करून घेणे. कारण मूळचा पिंड जसा असतो, त्याच्या अनुरूप आहार-आचरण ठेवणे हे आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यावश्यक असते. प्रकृती नुसती माहिती करून घेणे पुरेसे नसते, तर तिचा स्वीकार करून त्यानुसार जीवनशैलीमध्ये बदल करण्याची तयारी असावी लागते. सैन्यात भरती होण्यासाठी जशी खांद्यांची रुंदी, उंची, श्वसनाची क्षमता वगैरे गोष्टी पाहिल्या जातात, तसेच इतर कोणत्याही कामासाठी आपली प्रकृती, मानसिकता साजेशी आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते.

निसर्गाशी समन्वय
निसर्गनियमाशी आपल्या जीवनशैलीचा समन्वय असला पाहिजे. उदा. सूर्योदय झाला की निसर्गात चैतन्य येते, या उलट सूर्यास्त झाला की निसर्गही विश्रांती घेतो. तसेच शरीरालाही सूर्यास्तानंतर शांतता, विश्रांती हवी असते, तसे न करता रात्री कामात किंवा इतर काही करण्यात दंग राहायचेआणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहायचे किंवा रात्री उशिरा शरीरातील सूर्य म्हणजे अग्नी मंदावला असतानाही पोट भरून जेवायचे हे निसर्गाच्या विरुद्ध असते आणि याचाअर्थातच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

रोजची जागरणे, सतत गाडी-विमानासारख्या अति वेगवान वाहनातून प्रवास, ऋतूमधील बदलांचा विचार न करता किंवा आपण राहतो त्याप्रदेशातील हवामानाचा विचार न करता आपल्या सवयीनुसार किंवा आवडीनुसार आहार-आचरणठेवणे, शारीरिक व्यायाम, श्रम अजिबात न करणे आदी गोष्टी निसर्गाला विसंगतअसल्याने आरोग्याच्या दृष्टीने सहसा हिताच्या नसतात.

निसर्ग नियमानुसार वय वाढणे ही स्वाभाविक असते, पण त्यातही वात-पित्त-कफाचे न्यूनाधिक्यच असते. उदा.बालवयात कफाचे, तरुण वयात पित्ताचे आणि उतारवयात वाताचे आधिक्य असते. हेवात-पित्त-कफ त्या त्या वयात जितके संतुलित राहतील तेवढी त्यांची कामे व्यवस्थित होतात आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहते. म्हणूनच लहान वयात अभ्यंग, धूपन, व्यायाम हे कफ संतुलन करणारे उपचार करणे आवश्यक असते; मध्यम वयात कामाची धडाडी खूप असली तरी वेळेवर खाणे-पिणे, व्यायामाने शरीरातील लवचिकता कायम ठेवणे आवश्यक असते तर उतार वयात वात वाढू नये म्हणून अंगाला तेल लावणे, विश्रांती घेणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते.

 

- विनित मासावकर

 

5
सरासरी 5 (1 vote)
तुमचे रेटिंग

similarly lenders will only lend a limited sum on small business loans each one of us needs money at one or the other time in our life payday cash loans while making shopping spree this christmas make sure the interest doesnt extend to the time when you next see the snow secured bad credit personal loans are recognized as the loans that attach a clause of collateral with it typical apr on secured loan ranges from

»

similarly lenders will only lend a limited sum on small business loans each one of us needs money at one or the other time in our life payday cash loans while making shopping spree this christmas make sure the interest doesnt extend to the time when you next see the snow secured bad credit personal loans are recognized as the loans that attach a clause of collateral with it typical apr on secured loan ranges from

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation