Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

हातांची स्वच्छता

हातांची स्वच्छता
सौजन्य- web3.unt.edu

हात धुणे ही तशी साधी क्रिया आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्याला अत्यंत महत्व आहे. कधीतरी अस होत आपण एखादा  पदार्थ खातो आणि अचानक आपले पोट बिघडते. न धुतलेले हात हे अचानक बिघडलेल्या पोटाचे कारण असू शकते. खाण्याच्या अगोदर हात धुतलेले नसतील तर हाताच्या माध्यमातून जीवाणू हे शरीरात प्रवेश करतात. अशा पद्धतीने आपण स्वत:च स्वतःच्या हाताने आजारांना निमंत्रण देतो. 

आपण हातांचा उपयोग सकाळी उठ्ल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टींसाठी करतो. म्हणूनच ‘हात धुणे’ ही साधारण क्रिया वाटली तरी ती महत्वाची आहे. हातांची स्वच्छता राखल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. नाश्त्याच्या आधी, जेवण्याच्या अगोदर. प्रवासावरून आल्यानंतर, केरकचरा काढल्यानंतर, मुले बाहेरून खेळून आल्यानंतर आदी गोष्टी केल्यावर आपण हात स्वच्छ करतो का ? असा प्रश्न विचारला जर आपण स्वत:ला विचारला तर बऱ्याचदा त्याचे उत्तर नाही असेच येईल. मात्र आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हातांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. १५ ऑक्टोबर “हात धुण्याचा दिवस”  म्हणून सर्वत्र साजरा करतात.तेव्हा न विसरता, न चुकता आणि कंटाळा न करता हात धुवा आणि रोगांपासून दूर रहा.

हात न धुतल्याने कोणकोणत्या प्रकारचे  आजार  होऊ शकतात, त्याबद्दल पुढील लेखांमध्ये जाणून घेऊ... 


- मंजिरी केतकर-मासलेकर 

(लेखिका सामजिक कार्यकर्त्या असून गेली १६ वर्षे आरोग्य,शिक्षण  तसेच समुपदेशन या क्षेत्रात  विविध संस्थाबरोबर काम करत आहेत.) 


 

1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation