Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

या विभागात

व्यावसायिक पैशाचे व्यवस्थापन म्हणजे काय?

 व्यावसायिक पैशाचे व्यवस्थापन म्हणजे व्यावसायासाठी लागणाऱ्या पैशाचे नियोजन आणि विभागणी ही व्यावसायिक अर्थसंकल्पानुसार (बिझनेस बजेट) करणे होय. व्यावसयिक अर्थव्यवस्थापन हे व्यवसाय सुरु करण्याच्या अगोदर तयार केले जाते. व्यावसायाचे स्वरूप आणि एकूण मांडणीनुसार पैशाची विभागणी व्यावसायिक अर्थव्यवस्थापनात केली जाते.

व्यवसायिक अर्थव्यवस्थापनात कच्च्या मालाचे उत्पादन, यंत्रांच्या देखभालीचा खर्च, कामगारांचे पगार, जागेचे भाडे, विक्री आणि विपणन, ई. खर्च येतात. त्यासोबतच कार्यालयीन खर्चात विजेचे आणि दुरध्वनीचे देयक (इलेक्ट्रिक आणि फोन बिल), प्रवास खर्च, अल्पोपहार, दैनंदिन खर्च असे अनेक लहान – मोठे खर्च समाविष्ट असतात. व्यावसयिक दृष्टीकोनातून हे पैशाचे व्यवस्थापन एखाद्या कंपनीचा लेखापाल अधिकारी (अकाऊंट मॅनेजर) आणि मालक याबाबत निर्णय घेत असतात. व्यवसायात जी आपल्याला प्रकल्प, कामे, उद्योग,मिळतात, याची नोंद ही वेळोवेळी घेतली पाहिजे. कामांची विभागणी आणि पैशाचे नियोजन या परस्पर पूरक गोष्टी असून संबंधित व्यक्तींनी याचा ताळमेळ साधला पाहिजे. कारण अशा गोष्टी अर्थव्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या असतात.    

व्यवसायिक पैशाचे व्यवस्थापन करताना व्यवसायिक नातेसंबंध दृढ करणे, ते प्रगतीसाठी फायद्याचे ठरते. आजुबाजूची एकूण परिस्थिती आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी काही आर्थिक पर्याय उपलब्ध करून ठेवले पाहिजे. व्यवसायाचे ताळेबंद पत्रक म्हणजेच बॅलंस शिट आणि प्रोफिट अँन्ड लॉस अकाऊंटकडे अभ्यासपूर्ण निरीक्षण करणे जरुरीचे आहे.  

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा व्यावसयिक व्यवस्थापनामध्ये झाला पाहिजे. इंटरनेट, वेबसाईट, सोशल नेटवर्किंग साईट, अर्थव्यवस्थापनासाठीची पुस्तके, मासिके, ई. वापर व्यवसायिक अर्थव्यवस्थापनात करावा. व्यवसायिक अर्थव्यवस्थापनातील तज्ञ किंवा संबंधित व्यवसायातील व्यक्तीचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. अर्थव्यवस्थेतील बारकावे जाणून घेऊन त्याचा व्यवसायिक अर्थव्यवस्थापनासाठी योग्य वापर केला पाहिजे. स्वत:च्या व्यवसायाच्या घडामोडींची आणि जबाबदारीची इत्यंभूत माहिती शोधून त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचा फायदा हा व्यवसायिक अर्थव्यवस्थापनासाठी होतो. व्यवसायात पैशाचे व्यवस्थापन हे जबाबदारीने आणि परिस्थितीनुरूप कौशल्यपूर्ण हाताळणे, याचा व्यवसायिक उलाढालीत वापर केल्यास व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होते.   

 

 

- विनित मासावकर

5
सरासरी 5 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation