Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

मूर्तिकार

मूर्तिकार
सौजन्य - lucknowlive.blogspot.com

भारत हा उत्सवांचा देश आहे. विविध उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात येथे साजरे केले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, बैलपोळा, नागपंचमी आदी उत्सवांचा यामध्ये समावेश होतो. काही उत्सवांमध्ये मुख्य आकर्षण असते ते मूर्तीचे. ही मूर्ती तयार करत असताना मूर्तिकार विशेष काळजी घेत असतो. मूर्ती बनवताना स्वत:चे पूर्ण कौशल्य पणास लावून मूर्तिकार काम करतो. त्यामध्ये मूर्ती घडवण्यापासूनचे  काम म्हणजेच मूर्तीची उंची, हावभाव, मूर्तीची आखणी, तिचा बॅलन्स, आकारमान, रंगकाम, इ. बाबी लक्षात घेऊन मूर्तिकार काम करत असतो. 

मूर्ती बनवताना शाडूच्या मातीचा आणि प्लास्टर ऑफ पॅरीसचा वापर केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरीसचा वापर उंच मूर्तींमध्ये पहायला मिळतो. लहान मूर्ती बनवण्यासाठी शाडूच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरीसचा वापर करण्यात येतो. गणेशोत्सवात विविध सामाजिक आणि पौराणिक देखावे आणि चलचित्रे दाखवण्यासाठी मूर्ती बनवल्या जातात. भारतातील अनेक उत्सव, चित्रपट, कार्यक्रम, प्रदर्शने येथे मूर्तिकारांची कला तुम्हाला पहायला मिळेल.

मूर्तिकार एक व्यवसायाच्या दृष्टीकोनातून चांगले क्षेत्र मानले जाते. मूर्तीकारांचा व्यवसाय हा सिजनल असला, तरी हा व्यवसाय कलाकारांना फायदा मिळवून देतो. कलाकार आणि  आवड असणारे लोक या व्यवसायात अर्धवेळ आणि पूर्णवेळ काम करतात. मूर्तींकाराचे प्रशिक्षण, मूर्तीं बनवण्यासाठी लागणाऱ्या बाबी, मूर्तिकाराच्या व्यवसायातील संधी, इ. गोष्टींसाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा. 


– विनित मासावकर
    vinit.masavkar@pif.org.in

(मूर्तिकार व्यवसायातील माहिती श्री. सुशिल भोळे यांनी दिली आहे. मूर्तिकार या  क्षेत्रात गेली ८  वर्षे ते कार्यरत  आहेत.)

 

2.333335
सरासरी 2.3 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation