Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

या विभागात

प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे काय?

जगातील अनेक मोठी कामे किंवा उद्दिष्ट ही प्रकल्पांच्या माध्यमातून साध्य झाली आहेत. जितके मोठे उद्दिष्ट तेवढाच मोठा प्रकल्पाचा व्याप असं समीकरण दिसतं. प्रकल्पाचं यशस्वी होणं हे प्रकल्प व्यवस्थापनावर ठरतं. मग प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे तरी काय? चला समजून घेऊ.

उदाहरणार्थ : मुलांसाठी एखादी शाळा बांधायची आहे. यासाठी अगोदर वस्तीतील लोकांनी एकत्र येऊन बैठक घेतली पाहिजे. अनुभवी आणि अभ्यासू माणसांची एक समिती बनली पाहिजे. ही समिती शाळेला येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवेल. पैसा उभा करण्यासाठी देणगीदार आणि मदत करणाऱ्या संस्था शोधणे. शाळेसाठी काम करणारी कामगार मंडळी उपलब्ध करणे. शाळेसाठी योग्य जमीन शोधून कामगारांची नेमणूक करणे. जमा खर्च यांची जुळवाजुळव करणे. विविध छोटी – मोठी कामे करण्याची जबाबदारी लोकांनी घेऊन ती पार पडणे. उदा. कच्चा माल, फर्निचर, सरकारी कामे, इत्यादी कामे करणे. शाळेच्या सर्व कामांची जबाबदारी ही प्रकल्प व्यवस्थापनात येते.                         

एखादे ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी ते साध्य करताना गरजेच्या गोष्टींना मिळवणे, उपलब्ध साधनांची व्यवस्थित हाताळणी, त्यांचा योग्य वापर, कामांचे नियोजन, त्यातील लोकांच्या कामाची मांडणी आणि उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आखलेली योजना याचे अभ्यास म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन होय. प्रकल्प व्यवस्थापनासाठी आखलेली योजना ही वेळेचे बंधन आणि प्रकल्पासाठी असलेला पैसा यांचा विचार करूनच ठरवावी लागते. प्रकल्प व्यवस्थापनातील सर्वात मोठे आणि महत्वाचे आव्हान म्हणजे ठरलेल्या सगळ्या उद्दिष्टांची पूर्तता करणे आणि तेही वेळ, पैसा आणि उपलब्ध साधने यांचे बंधन पाळून. त्यातील दुसरं आव्हान म्हणजे पैसा आणि साधनांचा कौशल्यपूर्व पद्धतीने काटकसर करून केलेला वापर जेणेकरून उद्दिष्टांसोबत बचत ही साध्य करता येते. प्रत्येक वेळेस सर्व उद्दिष्ट साध्य होतातच असे नाही. अनेकदा प्रकल्पातील अडचणींना तोंड देत असताना, त्यावर उपाय शोधताना काही लहान उद्दिष्टे ही बाजूला सारावी लागतात पण अशा परिस्थितीत कोणता निर्णय जास्त फायद्याचा ठरेल हे फक्त प्रकल्प व्यवस्थापनाच्या अभ्यासातूनच कळू शकतं. कुठलाही व्यवसाय असो, उद्योग असो, या शास्त्राचा वापर प्रत्येक ठिकाणी होताना दिसतो त्यामुळे त्याला समजून घेणे महत्वाचे ठरते           

प्रकल्प व्यवस्थापन हे शास्त्र काही नवीन नाही. इतिहासात त्याच्या अनेक नोंदी आहेत. बांधकामासंबंधी असलेली अनेक कामे ही प्रकल्पांच्या माध्यमातूनच त्यावेळी होत असत. आपल्या दैनंदिन जीवनातही कळत-नकळत आपण हे शास्त्र वापरतच असतो. घरातील लग्न सभारंभ असो, घरातील काही किरकोळ बांधकाम किंवा इतर कुठला कार्यक्रम, त्याची हाताळणी आपण व्यवस्थित ठरवून आणि योजना आखूनच करतो. म्हणूनच जर प्रकल्प व्यवस्थापनाचा आपण नीट अभ्यास केला तर याचा उपयोग आपल्याला आपल्या व्यवसायातच नाही तर रोजच्या आयुष्यातही नक्कीच होऊ शकतो. 

 

- अपूर्व देशमुख

5
सरासरी 5 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation