Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

शेअर बाजारासाठीची पूर्वतयारी

शेअर बाजारासाठीची पूर्वतयारी
सौजन्य - www.thestar.com.my

शेअर बाजार हा सर्वांच्याच आवडीचा विषय. बाजारातले काहीही कळत नसले तरी त्याचा संबंध हा पैशाशी येतो. म्हणून प्रत्येकाला शेअर बाजारात येण्याची हौस असते. परंतु कोणी भीतीमुळे तर कोणी माहिती नसल्यामुळे शेअर बाजारात येण्यास दचकतात. 

शेअर बाजाराची पूर्वतयारी करण्यासाठी अभ्यासाची आणि व्यावहारिक गोष्टींची आवश्यकता असते. त्यासाठी प्रथम डिमॅट खाते उघडावे लागते. डिमॅट खाते हे बँकेत किंवा शेअर दलाल/कंपनीत उघडू शकतो. डिमॅट खाते हे बँकेतील बचत खात्यासारखे असते आणि त्यामध्ये शेअर जमा होतात. डिमॅट खात्यासाठी फोटो आयडेंटीटी प्रुफ, अॅड्रेस प्रुफ आणि अनामत रक्कम यांची आवश्यकता असते.

शेअर बाजारात उतरताना अभ्यास करण्याची गरज आहे. हा अभ्यास वर्तमानपत्र, शेअर बाजाराविषयक माहितीचे टीव्ही चेनॅल, बातम्या, गुंतवणूक तज्ञांची कंपनीविषयक माहिती अशा गोष्टींचा बारकाईने विचार करावा. आपल्याला ज्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, त्याचा विकास आणि बाजारातील पत हे पहावे. सुरुवातीला लहान प्रमाणात गुंतवणूक करावी. कारण ही आपली सुरुवात आहे. गुंतवणूक ही कमी – मध्यम आणि दीर्घ स्वरुपात करू शकतो. शेअर बाजारात महत्त्वाच्या ब्लू चिप कंपन्या आहेत. ३० ब्लू चिप कंपन्यांवर शेअर बाजाराची मदार अवलंबून आहे. शक्यतो सुरुवातीला गुंतवणूक करताना याच ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी.

शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन आणि माहिती वर्ग घेतले जातात. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे अनुभव आणि कौशल्य याबाबत अभ्यासपूर्ण आलेखन प्रत्येकाने केले पाहिजे. वर्तमान घडामोडींचा संबंध हा शेअर बाजाराशी निगडीत आहे. ‘संयम’ हा शेअर बाजारात महत्त्वाचा मनाला जातो. कारण “ पेशन्स इज द की ऑफ शेअर मार्केट ”.

 

- विनित मासावकर

 

 

3.92
सरासरी 3.9 (25 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation