Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

अंध मुलांचे शिक्षण

दृष्टीच्या म्हणजेच डोळ्याच्या सहाय्याने आपण जीवन बघण्याचा आनंद घेत असतो. डोळे काही वेळासाठी आपण बंद केले, तर आपल्याला डोळ्याचे महत्व समजते. परंतू ज्यांना जन्मत: किंवा अपघाताने अंधत्व आल्यास ती मुलेसुद्धा आनंदाने जगण्याचा अनुभव घेतात. अंध विद्यार्थ्यांना  शिक्षणाच्या दृष्टीकोनातून नवी दृष्टी देण्याचा यशस्वी प्रयत्न शाळा करत आहेत.  डोळस मुलांचे शिक्षण आणि अंध मुलांचे शिक्षण हे भिन्न नाही. परंतू शिक्षणात वापरण्यात येणारी साधने आणि पद्धती यात भिन्नता दिसून येते. दृष्टीच्या माध्यमातून आपण प्रचंड प्रमाणात शिकत असतो. दृष्टी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो अभाव भरून काढण्यासाठी स्पर्श,गंध, रुची आणि श्रवण या मर्यादित माध्यमांद्वारे शिकवावे लागते.

अंध विद्यार्थ्यांसाठी संशोधक लुईस ब्रेल यांनी “ब्रेल लिपी”चा शोध लावून त्यांच्या शिक्षणाचा एक मार्ग खुला करून दिला.अंध विद्यार्थ्यांना अध्ययनाचीप्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून ई-बुक, ऑडीयो बुक तसेच सीडीद्वारे सुविधा करण्यातआली आहे. पदव्युत्तरआणि उच्च शिक्षणात शिकल्यामुळे त्यांना आयटी-बीपीओ, अध्यापन,संशोधन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.  

समाजकल्याण विभागाच्या मान्यता प्राप्त व अपंगासाठीच्या १९९५ च्या कायदयातंर्गत नोंदणीप्रमाणपत्र प्राप्त अशा स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या अंध मुला-मुलींसाठी शाळानिवासी शाळा व कार्यशाळा कार्यान्वीत आहेत. शाळा व निवासी शाळेत ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना प्रवेश घेता येतो. या शाळांमध्ये शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार मनोबल वाढवुन शिक्षण देण्यात येते. शासकीय स्थरावर अंध आणि अपंग शाळांना विविध सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. काही शाळा अनुदान तत्वावर कार्यान्वीत आहेत.

म्हणून अंधत्व आलेल्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक दृष्टी देणे आवश्यक आहे, शाळा हे काम यशस्वीरित्या बजावू शकतात.

 

- विनित मासावकर
  vinit.masavkar@pif.org.in 

 

 

1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation