Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

डेक्सटॉप पब्लिशिंग कोर्स (DTP)

डेक्सटॉप पब्लिशिंग कोर्स

डीटीपी म्हणजेच डेक्सटॉप पब्लिशिंग हा कॉम्प्युटरमधील एक महत्वाचा कोर्स मानला जातो. विविध कॉम्प्युटर इन्स्टीटयूटमध्ये डीटीपी कोर्स शिकवले जातात. विविध प्रकारची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, आदी आपण पाहतो. तसेच लग्नपत्रिका, विजिटिंग कार्ड, पुस्तके, इत्यादींवरचे डिझाईन तुम्हाला आकर्षित करते. ही सर्व कामे डीटीपीमध्ये केली जातात.

डीटीपीमध्ये करियर करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरच्या विविध प्रोग्रामची माहिती पाहिजे. एमएस  ऑफिस(MS-Office), कोरल ड्रॉ (Corel Draw), पेज मेकर(PageMaker), फोटोशॉप (Photoshop) इ. सॉफ्टवेअर पकड पाहिजे. डीटीपी ऑपरेटरची मागणी प्रकाशन संस्था, अॅडव्हरटायझिंग एजन्सी,  डिझाईन, वृत्तपत्रे इ. ठिकाणी वाढत आहे. डीटीपीच्या अंतर्गत टेक्स्ट कंपोझिंग, वृत्तपत्राचे लेआउटिंग, डिझायनिंग, कंपोझिंग, लोगो, अॅडव्हरटायझमेंट डिझायनिंग इ. कामे केली जातात. डीटीपीचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही लहान मोठी कामे घेऊ शकता. त्यासाठी क्रीएटीव्हीटी, टायपिंग स्पीड, डिझाईन, तांत्रिक ज्ञान, तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करणे, इ. गुण असणे आवश्यक आहे. तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि एमसीएम, पीजीडीसीए, किंवा डीसीए हे कॉम्प्युटरविषयक कोर्स केले. तर तुम्हाला मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीदेखील मिळते.

Ώ डीटीपी कोर्ससाठीचे निकष -

■ शैक्षणिक आर्हता – १० वी पास

■ कालावधी – तीन महिने 

■ शुल्क – २,५००/- (कोर्सच्या शुल्कात ठराविक कालावधीनंतर बदल होतो.) 

डीटीपीवर तुमची उत्तम पकड असेल, तर तुम्हाला १० हजारापासून ते ३० हजारापर्यंत पगाराची नोकरी मिळू शकते. तसेच तुमच्या अनुभवाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर स्वतंत्र व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही डीटीपीसोबत अॅनिमेशन, वेब डिझाईन यांसारखे कोर्स केल्यास तुमच्या व्यवसायासाठी ते फायदेशीर ठरते. 


अधिक माहितीसाठी संपर्क - 

- अनिल दाभाडे 
  डी.सी.सी.- नेहरू नगर सी.आय.टी. सेंटर,
  फ्लॅट नं. ६, ३ मजला,
   भोसले हाइट, नेहरू नगर,
    पुणे – ४११ ०१८  
    ई- मेल – anil.pif@gmail.com 
    मोबाईल – ९८५०८५२५४१ 


संकलन - विनित मासावकर
            vinit.masavkar@pif.org.in
 

 


 

5
सरासरी 5 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation